Press "Enter" to skip to content

नरेंद मोदींच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण प्रेमी हितेंद्र घरत यांनी पेरल्या ७० हजार बिया


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत उरण तालुक्यातील केगाव गावचे पर्यावरण प्रेमी हितेंद्र घरत यांनी भरपावसात विविध किल्ले व जगलांत ७० हजार विविध फळांच्या बिया अनेकांच्या उपस्थितीत पेरण्याचे काम केले आहे. त्यांच्या उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


वाढत्या औद्योगिकारणामुळे पर्यावरणाचा समतोल ढळू लागला आहे. तो वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी हितेंद्र घरत यांनी प्रयत्न सुरू केला. त्यासाठी त्यांनी एप्रिल मे महिना म्हटलं की विविध फळांचा आस्वाद घेण्याचा हंगाम असतो. परंतु हितेंद्र घरत यांनी त्या फळांचा आस्वाद घेणाऱ्या आपल्या मित्रपरिवारांना त्या बिया फेकून न देता त्याबिया त्यांनी स्वतः गोळा करून त्या व्यवस्थित साफसफाई करून दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध किल्ले व रानात ते दरवर्षी हजारो बिया पेरण्याचे काम करीत आले आहेत. असा उपक्रम हितेंद्र घरत हे गेली २१ वर्षे करीत आले आहेत. यंदाचे हे २२ वे वर्षे आहे.


पर्यावरणप्रेमी हितेंद्र घरत यांनी यावर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज त्यांनी ७० हजार बिया त्यामध्ये
आंब्याचे बाटे, काजूच्या बिया, फणसाच्या बिया, जांभळाच्या बिया, कोकमाचे बिया व चिंचेचे चिंचोके यांचा समावेश होता. ते त्यांनी लोणावळा ते राजमाची किल्ला जंगलात त्यांचे मित्र, राजमाची किल्ला येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक समाजसेवक संजय वरे यांच्या सहकार्याने जंगलांमध्ये ३० हजार फळबिया पेरल्या, माणिकगड किल्ला येथे खालापूर येथील शेतकरी व ज्येष्ठ समाजसेवक श्री. रघुनाथ सोनगरे यांच्या सहकार्याने माणिकगड परिसरात २० हजार फळबियांची पेरणी केली, श्रीवर्धन दांडगुरी येथील जंगलात ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक श्रीकांतजी शेलार यांच्या सहकार्याने २० हजार फळबियांची पेरणी करण्यात आली.


अशा प्रकारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त हितेंद्र घरत यांनी ७० हजार फळबियांची विविध जंगलात पेरणी करून आपले संकल्प पूर्ण केला. याबद्दल पर्यावरणप्रेमी हितेंद्र घरत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.