अकरावी प्रवेशापासून अनेक विद्यार्थी अजूनही वंचित !! जादा विद्यार्थी घेण्यास शिक्षण विभागाची परवानगीच मिळेना !! 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून ) 🔶🔶🔷🔷
उरण तालुक्यात आणि विशेषतः उरण शहरात इयत्ता अकरावी सायन्सच्या शाळा प्रवेशाच्या निमित्ताने शिक्षणाच्या आयचा घो झाला असल्याचे समोर येत आहे .
आजही अनेक विद्यार्थ्यांना हव्या त्या विभागात शाळा प्रवेश मिळू शकलेला नसल्याची सनसनाटी माहिती हाती आली आहे शहरात ईग्रजी माध्यमाच्या असलेल्या अनेक शाळांनी आपल्याला अकरावी सायन्सच्या प्रत्येक तुकडीत विद्यार्थी जादा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी माध्यमिक विभागाच्या शिक्षण खात्याच्या चर्नी रोड येथील कार्यालयाचे उंबरे झिजविले आहेत मात्र तेथील एका अधिकारी वर्गाची काही दिवसांपूर्वी बदली झाली नसून नव्या अतिरिक्त अधिभार असलॆल्या अधिकाऱ्याला या शाळांच्या प्रस्तावावर निर्णय घ्यायला कोरोनाच्या काळात वेळच मिळत नसल्याने उरणमधील विद्यार्थी आणि पालकांच्या छातीचे मात्र ठोके वाढले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यातूनच प्रवेश न मिळू शकलेले पालक राजकीय व्यक्ती ,आजी माजी लोकप्रतिनिधी आदींचे ही उंबरे झिजवत आहेत मात्र या प्रत्येकाला बहुतेक शाळांतून आम्हाला जादा विद्यार्थी घेण्याची परवानगी मिळाली तर प्रवेश देण्याचा प्रयत्न करू असाच उत्तरं मिळत असल्याने पालकवर्ग मात्र आपलया पाल्याचे वर्ष तर फुकट जाणार नाही ना या चिंतेने ग्रासले असल्याचे दिसून येत आहे .
कोरोनाच्या महामारीच्या निमित्ताने शाळा सुरू होतील की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे . मात्र दहावीच्या निकालानंतर अनेक शाळानी आपली प्रवेश प्रक्रिया सुरू करून ती संपवली देखील आहे . सध्याच्या महामारीच्या निमित्ताने उरण तालुक्याच्या बाहेर म्हणजेच पनवेल , बेलापूर , वाशी , नेरूळ , मुंबई आदी भागात दहावीच्या नंतरच्या कोर्सेसना येथील विद्यार्थयांनी फारसे प्रवेश घेतलेले नाहीत त्यामुळे अनेक चागले गुना मिळालेले विद्यार्थयांनी ही उरणमधील स्थानिक शाळांमध्ये अकरावी प्रवेश घेण्यासाठी गर्दी केल्याने अकरावीच्या मेरीट लिस्ट सुमारे ८० टक्केच्या पुढेच बंद झाल्या असल्याने आजही साठ ते सत्तर पंचाहत्तर टक्के गुण दहावीला मिळालेले अनेक विद्यार्थी अकरावी सायन्स प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. अशा पालकांची मात्र निराशा सध्या होताना दिसत आहे.
आपल्यायाकडील शाळा प्रवेशाचा कोटा शिक्षण विभागाने निर्धारित केलेला संपला असे सांगत शाळांनी हात वर केल्याने विद्यार्थयांनी करावे काय असा प्रश्न या ठिकाणी पडला आहे . बाहुतेक शाळांनी आपल्याला प्रत्येक वर्गात किमान वीस विद्यार्थी जादा घेण्याबाबत शिक्षण विनंती केलेले आहे मात्र शिक्षण विभागाकडून आजच्या दिवसापर्यंत तरी त्यावर कोणताही निर्णयचं झालेला नसल्याने अकरावी सायन्स साठी तालुक्यात शेकडो विद्यार्थी ताटकळत असल्याची सनसनाटी माहिटी हाती आली आहे . या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल पालक वर्गाकडून विचारला जात आहे .






Be First to Comment