Press "Enter" to skip to content

बालयोगी केतन महाराज गुप्ता यांना राज्यस्तरीय आदर्श किर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार


                         
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔶🔷🔶🔷

कीर्तन प्रबोधनकार बाळयोगी केतन महाराज गुप्ता यांना राज्यस्तरीय आदर्श कीर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले केतन महाराज गुप्ता यांना मुंबई ऑनलाईन सोहळा झूम ॲप’वर मोबाईलद्वारे शिक्षक दिनाचे औचित्य साधुन हा पुरस्कार देण्यात आला.
                        
बालयोगी केतन महाराज यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील राष्ट्रीय बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे हा राज्यस्तरीय गुरुजन गौरव पुरस्कार २०२०या उपक्रमात केतन गुप्ता यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे.केतन महाराज गुप्ता यांनी बाल वयातच संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन व प्रबोधनात्मक सेवा करत असून त्यांनी आपल्या कर्तृत्वावर यानिमित्ताने लोकमान्यतेची प्रसन्न  गौरव मुद्रा उमटवली आहे त्याबद्दल हे सन्मानपत्र मनुष्यबळ विकास सेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अँड.कृष्णाजी जगदाळे यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने देण्यात आल आहे .
                
बाळयोगी केतन महाराज गुप्ता हे रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड येथिल असुन त्यांनी केलेले कीर्तन सेवेबद्दल त्यांना राज्यस्तरीय आदर्श कीर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार देण्यात आला याबद्दल केतन महाराज यांचे सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.