सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔶🔷🔷🔶
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून सेवा सप्ताह राबविला जात आहे . याअंतर्गत गुरूवार ( दि 17 ) कळंबोली वसाहतीतील सत्यम हाँस्पिटलमध्ये पक्षाच्यावतीने फळांचे वाटप करण्यात आले.
पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सेवासप्ताह प्रभावीपणे राबविण्यात येत आहे . या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना संकटात रुग्णाना मदत व्हावी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली भाजपचे सचिव संतोष गायकवाड यांच्या हस्ते सत्यम हाँस्पिटल कळंबोली मधील रुग्णाना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
.







Be First to Comment