भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याआधीच भातशेती पडली 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : पाताळगंगा : 🔶🔷🔷🔶
परतीचा पाऊस दर वर्षी शेतकऱ्यांच्या मुळावर उमठत आहे.शेतकरी चिंताग्रस्त झाले.भात शेतीच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असतांना परतीच्या पावसामुळे भात शेती पडली जात असल्यामुळे शेतकरी वर्गांस मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.त्याच बरोबर अजून काही नक्षत्र पडणे बाकी असल्यामुळे भात शेती पडली त्याच बरोबर भाताच्या लोंब्या मध्ये दाणा तयार होण्याच्या आधी पावसाने शेतकरी वर्गांस मोठा हादरा दिल्यामुळे भाताच्या लोंब्यामध्ये पळींज होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
या वर्षी लागवडीच्या वेळेस विलंब झाल्यामुळे लागवडीची कामे थोडीफार खोळंबली होती.त्यातच कोरोना सारखे संकट आल्यामुळे शेतीच्या कामाला मजूर मोठ्याप्रमाणावर मिळाले नाही.मात्र शेतकऱ्यांनी घरातील माणसे घेवून भात शेती लागवड केली.बाजारात येत असलेल्या दर्जेदार बियाना मुळे भात शेती चांगलीच बहरली असल्यामुळे या वर्षी चांगले पिक हाताला लागेल मात्र ही आशा फोल ठरली आहे.परतीच्या पावसामुळे भात शेती चांगलीच बहरलेली असली तरी सुद्धा ती पडत असल्यामुळे या वर्षी हाताला दाणा किती प्रमाणात मिळणार हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्यासाठी अजून दोन आठवडे लागण्याची शक्यता असल्याची शेतकरी वर्गाकडून वर्तविली जात आहे.मात्र लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याआधीच भात शेती पडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.मात्र असे असले तरी सुद्धा हाताला मिळेल ते घ्यायचे असेच विचार शेतकरी वर्ग करीत आहे.दिवसेंदिवस भात शेती कमी होत असतांना त्यातच तिचे तुकड्यामध्ये विभाजन होत आहे.शिवाय माती मध्ये टाकलेला पैसा वसूल होत नसल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत.त्यातच बियाने, मजुरी,खते अदि साठी मोठ्याप्रमाणावर आर्थिक निधी लागत असतो मात्र आर्थिक खर्च करुनही हवे तेवढ्या प्रमाणात धान्य मिळत नसल्यामुळे शेतकरी शेती कडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.मात्र असे असले तरी सुद्दा शेतकरी वर्ग शेती करीत आहे.







Be First to Comment