सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷
मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र्र राज्य सरचिटणीसपदी हाजी शाहनवाज अश्रफ खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे महाराष्ट्र्र प्रदेश अध्यक्ष रशीद शेख यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन खान यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली.
मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून हाजी शाहनवाज खान हे सर्व समाजातील युवाशक्ती संघटित करून त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यावर सातत्याने भर देत आहेत.तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने तन मन धनाने योगदान देत आहेत. याबरोबरच मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आजवर संविधानिक व शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग व पाठपुरावा वाखाणण्याजोगा होता.
त्यांच्या एकूणच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन शाहनवाज खान यांच्यावर राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली आहे. ते पदाला योग्य न्याय देतील असा विश्वास प्रदेश अध्यक्ष रशीद शेख यांनी व्यक्त केला. आपल्यावर ज्या विश्वासाने पदभार सोपविण्यात आला, ती कर्तव्ये जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असल्याची ग्वाही शाहनवाज खान यांनी दिली.







Be First to Comment