व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान : व्यापारी वर्गात तीव्र नाराजी 🔶🔷🔶🔷
सिडको अधिका-याच्या निर्लज्जपणाचा कळस 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 💠🌟💠🌟
कळंबोली मार्बल मार्केटमधील तब्बल साडेपाच कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या सर्विस रस्त्याची चालन झाली असून या रस्त्यावरून वाहन चालविताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ताच खड्यात गेल्याने व रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्डयाचा अंदाज येत नसल्याने वाहन पलटी होवून कधी जीवाला मुकावे लागेल याची भिती लागल्याने वाहनचालक मार्बल मार्केटमध्ये वाहन आणत नसल्याने व्यापारी वर्गाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे तेव्हा मार्बल मार्केट मधील सर्विस रस्ता त्वरीत दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी मार्बल मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजनाथसिंह राज पुरोहित यांनी सिडको प्रशासन कळंबोली यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
कळंबोली शहरात सर्वात मोठे मार्बल मार्केट बसविण्यात आले आहे. व शहरातील नागरिकांचा महामार्गाच्या वापराने जीव धोक्यात येवू नये हा दुहेरी उद्देश साध्य करताना कळंबोली वाहतुक कार्यालय ते पुरुषोत्तम पेट्रोल पंप असा सर्विस रोड देण्यात आला आहे मात्र सर्विस रोड असून सुद्धा तो बंद अवस्थेत होता. त्यामुळे मार्बल व्यापारी व नागरिकांच्या मागणी नंतर सिडको प्रशासनाने साडेसात कोटीचे सर्विस रस्त्याच्या कामाला मंजूरी दिली.
यामध्ये कळंबोली वसाहतींमधील कळंबोली वाहतुक कार्यालय ते पुरुषार्थं पेट्रोल पंप या दरम्यानच्या रस्त्याचे नूतनीकरणाच्या समावेश होता . सदर काम सिडकोकडून संबंधित ठेकेदाराने घेतले पण ते परवडत नाही म्हणून या ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार या रस्ताचे काम तीन वर्षे तसेच पडून होते. त्यानंतर २ वर्षापूर्वी हा रस्ता करण्यात आलेला होता. मात्र सद्यस्थितीत या रस्ता पूर्णतः निकृष्ट व निकामी झाल्याने साडेपाच कोटीच्या रस्त्यामध्ये तळे साचून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असा अवस्थेत आला आहे.

रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून गाड्या खड्यात जावून जीव धोक्यात येवू नये म्हणून दुकानदारानी आपल्या दुकानासमोर खड्यात झाडे लावली आहेत. या रस्तावरून वाहन चालविताना वाहनांचे पार्ट खराब होवून मोठे नुकसान होत आहे.
सिडको प्रशासनाकडून चांगल्या प्रतीचा रस्ता बनविण्याची निविदा असतानासुद्धा सिडको प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मार्बल व्यापारी व कळंबोली वासीयांच्या नशिबी पुन्हा खड्डेमय रस्त्या माथी मारला गेला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनेच मार्केट मध्ये येत नसल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग व नागरिकात तीव्र नाराजी पसरली आहे तेव्हा या रस्ताची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी मार्बल मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष राजनाथसिंह राज पुरोहित यांनी सिडकोकडे लेखी निवेदनाने केली आहे.
निकृष्ट बनविलेला रस्ता सात-आठ दिवसातच जागोजागी खचला होता. त्यावेळी आम्ही नाराजी व्यक्त केली होती पण सिडको म्हणजेआमची खाजगी मालमत्ता असा अधिका-यानी मनमानी कारभार केला. आता हा पूर्ण रस्ता उखडून गेल्याने रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आम्हा व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे म्हणून या रस्ता दुरुस्तीसाठी पाच वेळा लैखी निवेदन दिले आहे पण सिडको अधिकारी सुस्त तर जनता त्रस्त आहे. यावर लवकर निर्णय घेतला नाही तर व्यापारी वर्ग आंदोलनाच्या करणार.
रघुनाथसिह राज पुरोहित
अध्यक्ष -मार्बल मार्केट कळंबोली







Be First to Comment