Press "Enter" to skip to content

जेएनपीटीने १०० बेड हॉस्पिटलची प्रक्रिया सुरू केली

उरण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश 🔶🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔷🔶🔶

गेली अनेक वर्षे उरणमध्ये सुसज्ज हॉस्पिटल व्हावे अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने लावून धरली होती. त्यासाठी न्यायालयात धाव घेऊन जेएनपीटीला १०० बेडचे हॉस्पिटल उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार उशिरा का होईना जेएनपीटीने खासगी पद्धतीवर हॉस्पिटल सुरू करणार आहे. यामुळे उरण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

उरण सामाजिक संस्थेने २००९ सालापासून पासून सुसज्ज हॉस्पिटलची मागणी लावून धरलेली होती. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालयाने संबंधित अस्थापणांना १०० बेडचे हॉस्पिटल बांधून घेण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. आता जेएनपीटीने हॉस्पिटलसाठी निविदा काढली आहे.

हे हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी खुलं राहील यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील. महत्वाचे म्हणजे यापूर्वीही उरण सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने आणि उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याने १०० बेडचे एक हॉस्पिटल मंजूर झाले आहे. त्यासाठी सिडकोकडून भूखंडही मिळाला आहे.

मात्र निधीअभावी रखडलेल्या याही हॉस्पिटलचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील. माजी आमदार विवेक पाटील व इतर काही राजकीय व सामाजिक नेत्यांनीही सामाजिक संस्थेच्या आंदोलनाच्या माध्यमातून सभागृहात वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार जेएनपीटीने स्वतः हे हॉस्पिटल सुरू करणे आवश्यक असताना त्यांनी ते खासगी पध्दतीने हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्याचे समजते. उरणमध्ये हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर कमीकमी उरणमधील रुग्णांवर उरणमध्येच उपचार होतील. त्यामुळे रुग्णांचे बळी जाण्याचा आकडा कमी होईल असा विश्वास वाटत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.