Press "Enter" to skip to content

समाजसेवक अरविंद गायकर यांच्या उपोषणाला सुरुवात


मानवाधिकार संघटनेचा पाठिंबा जाहीर 🔷🔶🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / मुरूड / अमूलकुमार जैन 🔷🔶🔷🔶


मुरुड शहरातील समुद्र किनारी ४४ टपरी धारक ३ जुन रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये मुरूड समुद्रकिनारी असलेल्या ४४ टपरी धारक व स्टोल धारकांचे आतोनात नुकसान होवुन सुद्धा आज तीन महिन्यापेक्षा पेक्षा जास्त दिवस झाले तरी शासना कडुन टपरी स्टाॅल्स धारकांना नुकसान भरपाई न मिळाल्याने पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष- अरविंद गायकर यांनी शासनानला जागे करण्याकरिता मुरूड तहसिलदार कार्यालया समोर आज पासुन आमरण उपोषणला सुरूवात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी रायगड,व मुरुड तहसील कार्यालयाजवळ संपर्क साधून सुद्धा टपरी धारकांना नुकसान भरपाई देण्यास टाळा टाळ केली जात होती.पालकमंत्री याना सुद्धा पत्रव्यव्हार करूनसुद्धा नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर नियोजित इशाऱ्याप्रमाणे अरविंद गायकर यांचे उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी असंख्य टपरी धारक त्यांच्या समवेत होती.यामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून आला टपरी धारकांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे !,नुकसान भरपाई घेतल्याशिवाय हलणार नाही अश्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेले होते.

पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष- अरविंद गायकर यांनी या वेळी सांगितले कि, राज्य शासनाने महसूल व वन विभागाकडून १० जून रोजी एक अध्यादेश काढला गेला होता.यामधील क्रमांक ७ मधील मुद्यामध्ये अगदी स्पष्ठ पणे नमूद करण्यात आले आहे कि, दुकानदार व टपरीधारक हे स्थानिक रहिवाशी असतील त्यांना झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम अथवा १० हजार रुपये भरपाई रक्कम देण्यात यावी मग असे असताना आम्हाला कोणत्या आधारे मदत दिली जात नाही.

शासनाचा अध्यादेश असताना सुद्धा सरकारी अधिकारी गरीब टपरी धारकांना मदत देत नसल्यानेच मी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.जोपर्यंत आम्हाला मदतीचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.

या उपोषणास मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी आपला पाठिंबा दिला आहे.याबाबतचे अधिकृत पत्र त्यांनी गायकर याना दिले आहे.

सदरील उपोषणाच्या वेळी सर्व टपरी धारक तहसील कार्यालयाच्या आवारात उपस्थित होते.यावेळी मुरुड पोलीस ठाण्याकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.