सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : पाताळगंगा : 🔶🔷🔶🔷
दि.६ सप्टेंबरपासून पितृपक्षास प्रारंभ झाल्यामुळे अनेक ठिकाणी पितृश्राध्द हा कार्यक्रम साजरा केला जात आहे. तसेच त्याची सांगता गुरुवार दि.१७ रोजी सर्वपित्री अमावस्येला कावळी अमावस्या ने होत असते.पूर्वजांच्या स्मरणाचा काळ म्हणजे पुढच्या पिढीला संस्कारीत करण्याचे कार्य त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड जणू देवी -दैवतानि निर्माण केले आहे.
तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे यासाठी या पितृपक्षास निर्मिती झाली आहे असे म्हणता येईल.वाड -वडील, आई, वडील, भाऊ, पत्नी, काका, पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्षात मृत व्यक्तींना तर्पण पूजन केले जाते. त्यात त्यांच्या नावाने पितर बसवून त्यास भोजन दिले जाते.
यामुळेच २ सप्टेंबर पासून पितृपक्षास प्रारंभ झाले होते. दि.३ ,द्वितीया श्राध्द, दि.४,५ तृतीया ,६ चतुर्थी श्राध्द, दि.७ पंचमी श्राध्द,दि.८ षष्ठी श्राध्द, दि.९ सप्तमी श्राद्ध,दि.१० अष्टमी श्राध्द, दि.११ अविधवा नवमी श्राध्द, दि.१२ दशमी श्राध्द, दि.१३ एकादशी श्राध्द, दि.१४ द्वादशी,दि.१५ त्रयोदशी श्राध्द, दि.१६.चतुर्दशी श्राध्द,दि.१७ सर्वपित्री दर्श अमावस्या,सायंकाळी ४: ३० मी समाप्त होत आहे. आगारी अर्थात वैश्वदेव पूजन करून अग्नित आहुती दिली जाते. काव घास म्हणजे कावळय़ासाठी नैवेद्य देण्यात येतो. या मध्ये सात भाज्यांचा समावेश असतो
Be First to Comment