सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १९ जण सापडले आहेत. १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज मयत कोणी नाही.
आज एकूण पॉझिटीव्ह १६८२, उपचार करून बरे झालेले १३८२, उपचार घेणारे २२४, मयत ७९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज कोंढरीपाडा करंजा १, बल्लाळेश्वर अपार्टमेंट आंनदनगर १, मोरया अपार्टमेंट कामठा १, वैभव लक्ष्मी सोसायटी १, बोरी मोरा १, नवघर १, कस्टम चाल मोरा रोड ४, चिरनेर मुळपाडा १, धाकटीजुई १, रानसई १, चाणजे १, क्लासिक रेसिडेंन्सल बोरी पाखाडी १, कोटनाका १, जेएनपीटी २, मोठीजुई १ असे एकूण १९ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर विंधणे १, पिरकोन १, मुळेखंड १, पाणजे १, मोठीजुई १, जेएनपीटी २, नागाव २, कामठा मानेवाडी १, भेंडखळ १, द्रोणागिरी १ असे एकूण १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्याचबरोबर उपचार करून घरी सोडण्याचे प्रमाण ही बऱ्यापैकी आहे. मयताचा आकडाही वाढत नाही ही एक उरणकरांसाठी जमेची बाजू मानली जात आहे.







Be First to Comment