सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔷🔶🔷
लॉक डाऊन काळात येथील अश्वपालकांना आपल्या घोड्यांना खाद्य पुरवठा कसा करावा हा यक्षप्रश्न असताना अनेकांनी सढळ हाताने मदतीचा हातभार लावला होता. आजवरच्या या संकट समयी प्रत्येक अश्वपालकांना जवळपास दहा पेक्षाही अधिक गोणी भुसा देण्यात आला होता.
माथेरान हे १८ मार्च ते १ सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊन होते.त्यामुळे पर्यटकांना सुध्दा प्रवेश बंद करण्यात आला होता. पर्यटनावर अवलंबून असलेल्या गोरगरीब अश्वपालकांना आपल्या कुटुंबासह घोड्यांना खाद्य कसे द्यावे ही गहन समस्या निर्माण झाली होती. अशावेळी माथेरान सह मुंबई, पुण्यातील काही दानशूर व्यक्तींनी पुढे येत मोठया प्रमाणावर हे पशु खाद्य पुरविले होते.
नुकताच २ सप्टेंबर रोजी माथेरान अनल
लॉक केल्यानंतर पर्यटकांना प्रवेश देण्यात आला आहे परंतु सप्टेंबर महिना व्यावसायिक दृष्टीने पुर्णतः मंदीचा असतो त्यामुळे समाधानकारक खर्चिक पर्यटक येत नाहीत.हा महिना सुध्दा व्यावासायिक दृष्ट्या खूपच कठीण असल्याने येथील रुबी हॉल बंगल्याचे मालक समीर बांदेकर यांना इथल्या अश्वपालकांच्या व्यथा ज्ञात असल्याने घोड्यांसाठी भुसा वाटप कार्यक्रम आयोजित केला.
जवळपास १५० गोणी भुसा त्यांनी सर्व गरजवंत अश्वपालकांना वाटप करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सुध्दा समीर बांदेकर यांनी घोड्यावरून पडून पर्यटक जखमी होऊ नयेत यासाठी स्वखर्चाने अश्वपालकांना हेल्मेट दिले होते. याचा उपयोग पर्यटकांना घोडेस्वारी करिता झाला होता. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण सुध्दा नगण्य झाले होते. माथेरान वर निस्सीम प्रेम असणारे समीर बांदेकरयांना इथल्या कष्टकरी गोरगरीब श्रमिक लोकांचीजाण असल्यामुळे नेहमीच काहींना काही मदत सढळ हाताने देत असतात. त्यांनी सध्याच्या व्यावसायिक मंदीच्या काळात अश्वपालकांना घोड्यांसाठी भूशाचे वाटप केल्यामुळे अश्वपालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
आमचे मित्र समीर बांदेकर हे नेहमीच माथेरान मधील गरजवंताला मदतीसाठी पुढाकार घेत असतात.यावेळी सुध्दा आम्ही त्यांना इथल्या अश्वपालकांची समस्या कथन केली होती. त्यानुसार त्यांनी ताबडतोब १५० गोणी भुसा देण्याचं मान्य केले आणि त्याप्रमाणे येथील अश्वपालकांना याचा लाभ झाला आहे.त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यापुढेही त्यांनी वेळेनुसार इथल्या गरजवंतांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा.
प्रसाद सावंत --गटनेते माथेरान नगरपरिषद
आमच्या गरजवंत अश्वपालकांना कठीण काळात समीर बांदेकर यांनी जी काही घोड्यांना खाद्य देण्याची मदत केली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे कारण अद्याप आमचा पर्यटन हंगाम सुरू झालेला नाही. पर्यटन हीच शेती असल्याने पर्यटक आले तरच सर्वांना रोजगार उपलब्ध होतो सध्यातरी ही वेळ आर्थिक दृष्ट्या खूप कठीण होती आमच्या अश्वपालकांना भुसा वाटप केल्याबद्दल समीर बांदेकर यांचे संघटनेच्या वतीने आभारी आहोत.
आशाताई कदम -- अध्यक्षा अश्वपाल संघटना माथेरान







Be First to Comment