महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिला आंदोलनाचा इशारा 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶
रसायनी हद्दीतील नागरिकांना पनवेल, मुंबई याठिकाणी जाण्यासाठी मुंबई-पुणे जुन्या महामार्गांवर भिंगारवाडीजवल शेडुंग टोलनाक्यावरुन जावे लागते. रसायनीकरांसाठी हा मुख्य रस्ता असल्याने परीसरातील नागरिकांची या रस्त्यावरून नेहमीच रेलचेल सुरू असते.या टोलनाक्यावरुन परीसरातील खाजगी वाहन जात असताना टोल मागणी होत आहे.
याबाबत स्थानिकांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड यांना सांगून स्थानिकांची टोलबाबत समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी केली.यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शेडुंग टोल नाक्यालगत असणाऱ्या दहा कीलोमीटर अंतरावरील गावांना सुट ( टोल माफी) देण्याकरिता निवेदन देण्यात आले.
सत्यजित तांबे यांनी त्वरित महाराष्ट्र राज्याचे रस्ते विकासमंत्री एकनाथ शिंदे व आयआरबीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांना पत्र लिहून टोल माफीच्या संदर्भात मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुखदरे आदी उपस्थित होते.







Be First to Comment