‘आरोग्यम धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे कार्य 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत लोकसंख्येत प्रचंड वाढ होत असून पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे.त्यामुले वाढत्या लोकवस्तीला आवश्यक सोयी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होत असतानाही वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेली कचरा,घाण आदींची विल्हेवाट लावून नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत डंपिंग ग्राऊंडची सुव्यवस्था नसल्याने नागरिकांकडून कचरा उघड्यावर टाकला जात आहे.परीसरातील चांभार्ली थांब्याजवल,टिसीआय गोडाऊन,रिस पुल,मोहोपाडा सावंत इमारतीसमोर आदी भागात नागरिक आपल्याजवलील कचरा उघड्यावर टाकत असल्याने दुर्गंधी येवून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये,याकरिता वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी जेसीबीच्या साहाय्याने कचरा सफाईं करुन ट्रक्टर ट्रालीतून काही अंतरावर नेत त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे.
नागरिकांनी आपल्या जवळील घाण,कचरा रस्त्यालगत टाकू नये यासाठी ग्रामपंचायतीकडून सूचनाफलकही लावण्यात आले आहेत.तरीही नागरिक कचरा उघड्यावर टाकत असल्याचे दिसून येते. यात ग्रामपंचायतीच्यावतीने काहींवर कारवाईंही झाली असतानाही नागरिकांतून दुर्लक्ष होत आहे.याकरिता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीची घंटागाडीही गावोगावी फिरून कचरा गोळा करण्याचे काम करीत आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीकडून परीसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावली जात असून नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकण्याच्या जागेवर वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.तरी नागरिकांनी आपल्याजवलील कचरा उघड्यावर टाकू नये असे ग्रामपंचायतीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.







Be First to Comment