सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔶🔷🔶🔷
आमदार प्रशांत ठाकूर व कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने आज ( दि 16 ) कळंबोली वसाहतीतील सेक्टर १४ ते १५ येथिल अर्तगत रस्ते व गटराचे काम सुरू करण्यात आले. या परिसरातील रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले.

कळंबोली सेक्टर १४ व १५ मधील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जे-जा करताना अनेक अडचणी येत होत्या. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील रहिवासीनी कळंबोली शहर भाजपा अध्यक्ष रविनाथ पाटील माजी सभापती नगरसेवक अमर पाटील नगरसेवक राजेद्र शर्मा नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. या रस्ता दुरूस्तीसाठी रविशेठ पाटील व नगरसेवकाांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे दाद मागितली होती त्याला यश येेवून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने व नगरसेवकांनी केलेल्या मागणीला यश येवून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे







Be First to Comment