Press "Enter" to skip to content

(PSA) बंदरावर महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाचा झेंडा

सिटी बेल लाइव्ह / उद्योग प्रतिनिधी / उरण : 🔶🔷🔶🔷

पोर्ट ऑफ सिंगापूर अॅथॉरिटी (PSA), BMCT बंदरातील क्युशी व आर.टी.जी ऑपरेटर परमनंट कामगारांनी बंदरातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपले न्याय हक्क प्रस्थापित करण्याकरिता कामगार क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारे झुंजार कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखालील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे.

गेली ३३ वर्षे कामगार क्षेत्रात अखंडपणे आपल्या लढाऊ नेतृत्वाखाली हजारो कामगारांना न्याय मिळवून देणारे, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ILO – ITF या बलाढय संघाचे प्रतिनिधीत्व करत असलेले महेंद्र घरत यांनी सातत्याने असंघटित, अन्यायग्रस्त कामगारांच्या प्रश्नांवर वेळोवेळी लढे व आंदोलने, मोर्चे, संप पुकारून कामगारांचे न्याय हक्क प्रस्थापित केलेले आहेत. म्हणूनच कामगार क्षेत्रात असंख्य युवकांनी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या या चळवळीत महेंद्र घरतांच्या साथीने स्वत : ला झोकुन दिलेले आहे.

आज बुधवार दि. १६ सप्टे. २०२० रोजी PSA बंदराच्या मुख्य प्रदेश व्दारावर न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण कामगार नेते महेंद्रजी घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महेंद्र घरत यांनी PSA बंदरातील कामगारांना संबोधताना सांगितले कि ३ वर्षीपुर्वी PSA बंदरातील ट्रेलर चालकांवर व्यवस्थापनाने अन्याय केला, त्यांना संघटित करून मुजोर व्यवस्थपनाच्या दादागीरीला भीक न घालता, कामगारांच्या पगारवाढीचा यशस्वी करार जी. टी. आय या बंदरातील ड्रायव्हर पेक्षा जास्त पगार व भत्ता मिळवून दिला आता बंदरातील कायमस्वरूपी कामगारांना ITF च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्थरावरील वेतनाप्रमाणे वेतन मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले.

या नामफलक अनावरण प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, विनोद म्हात्रे, संजय ठाकूर, संघटक रोहित घरत, आदीनाथ भोईर, प्रेमनाथ ठाकूर, अंगद ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, प्रांजल भोईर, राजेंद्र भगत, विवेक म्हात्रे, आदीत्य घरत, हितेन घरत, अरूण म्हात्रे, अमोल ठाकूर, प्रसाद पाटील, आंनद ठाकूर व सिंगापूर पोर्टचे कामगार उपस्थीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.