Press "Enter" to skip to content

सुकेळी खिंडीजवळ मोकाट गुरांचा रास्तारोको : प्रवाशांच्या जीवाला धोका

सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) 🔶🔷🔶🔷

मुंबई-गोवा महामार्ग जवळ सुकेळी खिंडीच्या पायथ्याशी मोकाट गुरांचे रास्ता रोको केल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असून याकडे संबंधित व्यक्तीकडून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपली शेती मुंबई दिल्ली येथील धनिकांना विकल्या असून ९ ते १०वर्षात जमिनी विकण्याचा व्यवसाय जोमाने झाला आहे यातच आपल्याकडील शेती विकणाऱ्या शेतकऱ्यांची बिनकामी गोरे मोकाट सोडलेले आहेत तर जमिनी विकत घेतलेल्या मालकांनी सर्व शेती भोवती तारेचे कुंपण घातले आहे त्यामुळे शेती विकलेल्या शेतकऱ्यांची गुरे चारण्यासाठी जागा राहिली नसल्याने शेतकऱ्यांची ही गुरे मोकाट सोडले असून हि गुरे मुंबई-गोवा मार्गावर रस्त्याच्या मधोमध उभी राहून जणू रास्ता रोको केल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी मोकाट सोडलेली गुरे दररोज सुकेळी खिंडीच्या पायथ्या जवळील वळणावरील झाडाखाली रस्त्यात उभी राहत असल्याने हि गुरे प्रचंड वळणामूळे वाहन चालकाला त्वरीत लक्षात येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असुन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.व मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

यातच गुरांना अपघात झाला तर शेतकरी भरपाई मिळण्यासाठी धावत येतो परंतु त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचा अपघात झाला तर शेतकरी जवळ येत नाही अशा मोकाट गुरांचा बंदोबस्त संबंधितांकडून करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्ग करून केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.