सिटी बेल लाइव्ह समूहाकडून या रानकवींना मानाचा मुजरा
नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड-कन्नड , १६ सप्टेंबर १९४२ ला झाला, हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.
महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे.
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध येतो.
झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या.
देवकी पंडित यांनी महानोरांनी लिहिलेली काही चित्रपट गीते गायली आहेत, ती अशी :-
जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी -ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – रवींद्र साठे)
तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी – ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – आशा भोसले)
सूर्यनारायणा नित् नेमाने उगवा (कवी – ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक)
श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.
डाॅ. शुभा साठे यांनी ना.धों. महानोरांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
संगीत दिगदर्शक हर्षित अभिराज यांनी ना.धों. महानोर यांच्या ‘दूरच्या रानात केळीच्या बनात’ या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली होती..
महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले,महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले, मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.
संकलन : अजय शिवकर
Be First to Comment