Press "Enter" to skip to content

उलवे येथे जागतिक ओझोन थर संरक्षण दिनानिमित्त वृक्षारोपण


सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (मनोज पाटील) 🔷🔶🔶🔷


पृथ्वीभोवतीचे ओझोनचे जाळे विरळ झाल्यामुळे सुर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर पडू लागल्याने पृथ्वीवरील तापमान वाढीचे प्रमाण खुप वाढू लागले आहे. पृथ्वीची कवचकुंडले म्हणजेच ओझोन वायुचा थर असाच वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे कमी होत गेल्यास भविष्यात पृथ्वीवरील जीवसृष्टीला खुप मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळेच १६ सप्टेंबर जागतिक ओझोन थर संरक्षण दिनाचे औचित्य साधून वटवृक्ष फांऊडेशनच्या वतीने उलवे येथे वृक्षारोपण करण्यात आले.

ओझोन थराच्या वाढीसाठी वृक्ष लागवड हा अतिमहत्वाचा पर्याय असल्यामुळे उलवे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वटवृक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष व वृक्षप्रेमी किरण मढवी, पोलीस उप निरिक्षक इंगले ,सचिन बोठे ,किरण म्हात्रे ,गणेश शिंपी ,मोहन गोरिवले, गणेश मढवी, आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.