कोरोना महामारीत विद्यार्थ्यांकडून फी मागणाऱ्या श्री राज एज्यूकेशंन सेंटर स्कूलवर कारवाई करण्याची मनसेची मागणी..! अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷
संपूर्ण जगावर कोरोनासारख्या जैविक महामारीचे संकट आहे. अशातच सरकारने शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांकडून फी घेऊ नये असे आदेश दिल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच सुधागड तालुक्यातील तांबडमाळ येथील श्रीमद रामचंद्र आश्रम यांच्या श्री राज एजुकेशन सेंटर स्कूलकडून कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांकडून फी मागितली जात आहे. त्यामुळे या शाळेवर कारवाई करण्याची मागणी सुधागड तालुका मनसेच्या वतीने अध्यक्ष सुनील साठे व विभाग अध्यक्ष केवल चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन सुधागड-पाली गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास-पवार यांना दिले.
सुधागड तालुक्यात गोरगरीब, कष्टकरी, मजूर, शेतकरी तसेच आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. आपली मुले शिकून मोठी व्हावीत याकरिता पालक जीवाचे रान करतात. अशातच कोरोना महामारीने साऱ्यांचेच जीवन विस्कळीत झाले आहे.रोजगार हिरावल्याने अनेकांवर उपासमारीसारखे संकट ओढवले आहे. अशात श्री राज एजुकेशन सेंटर स्कूलकडून फी ची सक्ती केली जात असल्याची तक्रार मनसेने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
या शाळेने पालकांना मासिक फी भरली तरच पुस्तके मिळतील असे सांगितले आहे. राज्य शासनाचा आदेश आहे की कोरोनाच्या काळात कूठल्याही परिस्थितीत फी घेवू नये, परंतू ही शाळा शासन निर्णया विरोधात वागत आहे. म्हणून अशा शाळेवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी सुधागड मनसेतर्फे देण्यात आला. निवेदन देतेवेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे व विभाग अध्यक्ष केवल चव्हाण व इतर मनसैनीक उपस्थीत होते.







Be First to Comment