Press "Enter" to skip to content

“त्या” महिलेसाठी पालीतील रुग्णवाहिका चालक ज्ञानेश्वर जगताप बनला देवदूत

ऑक्सिजन वेळीच लावून वाचविले  प्राण : महीलेच्या कुटुंबाने ज्ञानेश्वरापुढे जोडले हात 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷

कोरोनासारख्या जागतिक महामारीने  संपूर्ण जगाला पछाडले आहे. या संकटात अनेकजण कोविड योद्धे म्हणून जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. पालीतील ज्ञानेश्वर जगताप या रुग्णवाहिका चालकाने समयसूचकता राखत तत्परता दाखवत  चपळाईने एका महिलेला जलदतेने ऑक्सिजन लावून  तिचे प्राण वाचविले आहे.

अमृता मिलिंद मेकडे या  रुग्ण महिलेसाठी ज्ञानेश्वर जगताप देवदूत बनला असल्याचे सांगत कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर चे आभार मानले. कोरोनाचा धोका असताना रुग्णसेवेचे व्रत अग्रस्थानी मानून स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ज्ञानेश्वर जगताप मागील कित्येक महिने रुग्णसेवा करीत आहे. रुग्णाला वेळेत ऑक्सिजन मिळाला नाही तर त्याच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे त्याने ऑक्सिजन किट हाताळणीचे प्रशिक्षण घेतले आहे. याचा उपयोग अनेकदा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी होताना दिसतोय. 

पाली ग्रामपंचायत सदस्य अजय मुळे  यांची बहीण अमृता मिलिंद मेकडे यांना अपेंडिक्स चा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी वीर हॉस्पिटल पनवेल येथे दाखल केले होते. शस्त्रक्रिया करण्यापुर्वी  डॉक्टरांनी त्यांची  कोव्हिडं 19 ची टेस्ट केली असता टेस्ट पॉजिटिव्ह आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना इतर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण इतर दवाखान्यात  उपचारासाठी दाखल करताना बेड मिळणं कठीण झाले  होते. अखेर  3 तासानंतर बेड मिळाला.

यामध्ये बराच कालावधी गेल्याने रुग्णाचा ऑक्सिजन स्थर खालावला, व त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी पालीतील रुग्णवाहिका चालक ज्ञानेश्वर जगताप हे रुग्णाला सोडण्यासाठी  मुंबईला गेले होते. यावेळी  अमृता मेकडे यांना  शिफ्टिंग दरम्यान  श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पाहून ज्ञानेश्वर ने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पी पी इ  किट घालण्यास वेळ दवडू न देता जलदतेने ऑक्सिजन लावला. 

ज्ञानेश्वर जगताप यावेळी देवदूत बनून आला. आज ज्ञानेश्वर जगताप यांच्यामुळे माझी बहिण सुखरूप डी वाय पाटील  दवाखान्यात पोहचली. व तिच्यावर यशस्वी उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर जगताप याचे उपकार आम्ही आयुक्ष्यात कधीही विसरू शकत नाही, त्याचे आभार मानू तेवढे थोडेच या शब्दात अजय मूळे यांनी कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले.

सध्या कोरोनाच्या संकटात एकमेकांना  मदत करणे ही आपली कर्तव्ये जबाबदारी आहे. संकट कोणतेही असो माणुसकी धर्म विसरू नये. रुग्णवाहिका चालक असल्याने रुग्णांबाबत अनेकदा वेगवेगळे प्रसंग समोर येतात. यावेळी प्रत्येक रुग्ण हा आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याच्या भावनेने मला जेवढ जमेल तितक सहकार्य मी करतो. वेळ प्रसंग हा सर्वांवर येतो, त्यामुळे प्रत्येकाने अडीअडचणीच्या प्रसंगी मदतीला धावून आले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. 

ज्ञानेश्वर जगताप,
रुग्णवाहिका वाहनचालक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.