Press "Enter" to skip to content

टाटा समूहाकडून कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मशीन


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

टाटा समूहाकडून रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मशीन भेट देण्यात आली. त्या मशीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याकडे सुपूर्द केल्या.

चौक खालापुर, कर्जत व अलिबाग येथे टाटा समुहाकडून कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मशीन देण्यात आली. या मशीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

याप्रसंगी विडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांच्याबरोबर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी संवाद साधुन जिल्ह्याचा कोरोना या महारोगाबाबत आढावा घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.