सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे/प्रशांत पोतदार) 🔷🔶🔷🔶
पेण तालुका म्हणजे गणपतीचे माहेर घर इथे सुरेख सुंदर गणेशमुर्त्या बनवण्याचे काम वर्षभर गणेश केंद्रात चालते त्यासाठी हजारो हात दिवस भर राबत असतात परंतु या वर्षी कोरोनाच्या विषाणूमुळे लॉक डाऊनमध्ये बंद पडलेले कारखाने आणि नंतर निसर्गचक्रि वादळामुळे गणपती कारखानदार अगदि मेटाकुटीला आला आहे त्यातच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्यामूर्तीला केलेली बंदी यामुळे कारागिरांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.
वर्षांन वर्षी गणेश मुर्ती बनवनारे कारागिर काम नसल्याने उदरनिर्वाहाच्या चिंतेत आहेत यावर मात करण्यासाठी कारागिर पुन्हा सज्ज झाले आहेत पेण येथील कारखाण्यात अनेक वर्ष काम करणारे प्रकाश बावकर यांनी काम नसल्याने खचून न जाता आपल्याच घरात शाडुच्या मातीचे गणपती तयार करण्यास सुरुवात केली असुन पुढील वर्षी मातिच्या गणपतीला मागणी असल्याने शाडु मातीचे गणपती बनवण्यात येत आहे.
लॉक डाऊन आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीच्या बंदीमुळे मातिच्या गणपतीची मागणी वाढत आहे.बावकर यांनी आपल्या घरातील कारखाण्यात शंभर वर शाडुमातीच्या गणेशमुर्त्या तयार केल्या आहेत.वाढती महागाई आणि उदरनिर्वाहाच्या चिंतेत न राहता गणपती मुर्ती बनवण्यात बावकर कुटुंब मग्न झाले आहेत.वर्षांनो वर्षी पेण तालुक्यात सुंदर सुबक आकर्षक गणेशमूर्ती बनवण्याचे काम कारागीर करत आहेत परंतु कोरोनामुळे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर येत असलेली बंदी यामुळे कारागिरांवर बेरोजगारीची टांगती तलवार असल्याने वाढती मागणी आणि उदरनिर्वाहासाठी शाडुच्या गणेश मुर्त्या बनवण्याकडे कारागिरांचा कल वाढत आहे.







Be First to Comment