नव्याने आढळले 4 कोरोना बाधित रुग्ण : 14 जण बरे होऊन परतले घरी,एकूण बाधीत 328 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🔶🔷🔷🔶
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुधागड तालुका प्रशासन, आरोग्य यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. आता तालुक्यात मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्या घटताना दिसत असून सुधागड तालुक्यात सोमवारी (दि.14) 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 14 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
सुधागड तालुक्यात आता कोरोनाचे 328 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत कोरोनाचे 252 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून विविधांगी उपाययोजना राबविल्या जात आहेत. स्पेशल टास्क टीमद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे.
नागरिकांनी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे आणि शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.
Be First to Comment