सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔶🔷
अज्ञात व्यक्तीने गायीना विषारी पदार्थ खायला घातल्यामुळे दोन गायी आजारी पङून विकलांग झाल्याची घटना घङली असून क्रूरपणा बाबत संताप व्यक्त होत आहे. वीणानगर खोपोली भागात अज्ञात व्यक्तीने गायीना खायला घालून त्यामध्ये विषारी पदार्थ मिसळला होता.सकाळी आठच्या सुमारास गायी विकलांग अवस्थेत पङलेल्या पाहून मालकाच्या लक्षात प्रकार आला.
अज्ञात व्यक्तिविरोधात खोपोली पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम 429, 379 प्राण्यांची निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंद कायदा 1960 सह महाराष्ट पोलीस अधिनियम कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई अमोल वळसंग हे करित आहेत.






Be First to Comment