Press "Enter" to skip to content

पोलीस लाईन बॉईज संघटनेतर्फे कंगना रानौत विरोधात उरण पोलिसांत तक्रार


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

महाराष्ट्र राज्याने अभिनेत्री म्हणून मान मिळवून दिला, ज्या मुंबई पोलिसांचे गुणगान देश गातो, अश्या महाराष्ट्र आणि मुंबईत आता सुरक्षित वाटत नाही, असे बेताल वक्तव्य करून मुंबई पोलिसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कंगना रानौत ने पोलिसांचा आणि पोलिसांच्या परिवाराचाही अपमान केला आहे अश्या कंगना रानौत वर कारवाई व्हावी अशी मागणी करणारे निवेदन आज पोलीस लाईन बॉईज संघटनेच्या वतीने उरण पोलीस स्टेशनला दिले.

आम्ही देशाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या परिवारातील मुले असल्याने आमच्या कर्तव्यदक्ष पालकांच्या अर्थात पोलिसांच्या झालेल्या अपमानाचा आम्ही जाहीर निषेध करतो असेही या पत्रात त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री कंगना रानौतने मुंबई पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. याचा जाहीर निषेध करून अभिनेत्री कंगना राणावत विरोधात ३५३ व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी गुन्हे वपोनी अतुल अहेर यांच्याकडे सादर केले. यावेळी उपाध्यक्षा स्नेहा गोडे, सचिव हेमंत सूर्यराव, आणि धनेश मळगावकर, सुदर्शन पाटील, रविंद्र मोकल, स्वप्निल कुंभार, हितेश भोईर, मनिष पाटील, महेंद्र म्हात्रे, वैभव तिलोरे, महेश पाटील, हेमंत थवई, प्रथमेश पाटील, तेजस्वी मळगावकर, माधुरी पाटील, सोनाली सूर्यराव आदी सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.