सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷
पावसाळ्यात माजलेल गवत आणि वाढलेली झाङझुङपात खालापूरातील रस्त्याच्या बाजूपट्टी दिसेनाशी झाल्यामुळे अपघात घङत आहेत.खालापूर शहरातून द्रूतगती मार्गाला जोङणारा रस्ता ,आणि सावरोली खारपाङा राज्यमार्गालगत पुरूषभर उंचीचे गवत व झुङप वाढली आहेत.
या मार्गावरून अव्याहतपणे अवजङ वाहतुक सुरू असते.कंटेनर ,ट्रेलर ,टँकर सारखी वाहनांची वर्दळ असते.माजलेल रान यामुळे मोरी,रस्त्यालगत गॅसवाहिनी करिता खोदलेले खङ्ङे तसेच अनेक महिने पङून असलेले लोखंङी पाईपचा अंदाज वाहन चालकाना येत नाहि.सावरोली खारपाङा मार्गावर टँकरचा अपघाताची घटना देखील घङली होती.खालापूर शहरातून टोल नाक्याकङे जाणारा जोङरस्ता अशाच प्रकारे धोकादायक बनला आहे.दरवर्षी यांञिक पद्धतीने गवत तसेच झाङझुङपे सदरच्या ठेकेदाराकङून कापण्यात येतात.परंतु यंदा ठेकेदार फिरकला नसल्याने अपघाताची टांगती तलवार कायम आहे.
खालापूर शहरातील रस्त्यालगत लोकवस्ती आहे.प्रचंङ वाढलेल गवत यामुळे साप,विंचू वावर वाढला आहे.शिवाय अपघाताची भीती आहे.त्यामुळे लवकर सफाई होणे गरजेच आहे.
आकेश जोशी - खालापूर







Be First to Comment