सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷
उरण तालुक्यातील भेंडखळ गावात कोरोना6 प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डॉक्टर विद्या पाटील यांच्याकडून ग्रामस्थांची तपासणी करण्याचे सुरू आहे.
भेंडखळ गावात कोरोनावर मात करण्यासाठी दिनांक 11 ते 18 लॉकडाऊन करण्यात आले आहे. गावांतील आरोग्याधिकारी डॉक्टर श्रीमती विद्या पाटील भेंडखळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच सौ सोनाली ठाकूर माजी सरपंच योगिता ठाकूर माजी सरपंच संध्या ठाकूर भेंडखळ गावातील प्रत्येक घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करत आहेत टेंपरेचर चेक करणे आणि ऑक्सिजन चेक करण्याचे काम चालू आहे.
ग्रामपंचायतीच्या या मोहिमेला गावातील ग्रामस्थांकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. यामुळे गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होईल असा विश्वास ग्रामस्थांना वाटत आहे.
Be First to Comment