कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मुर्तीकारांना दिलासा 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷
कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड व अन्य ठिकाणच्या गणेश मूर्तिकारांचे मोठं नुकसान झाले आहे. सरकारच्या निर्बंधांमुळे तयार मूर्तीदेखील पडून राहिल्या. सरकारने इतर सर्व नुकसानग्रस्तांना मदत दिली, मात्र मदत जाहीर करूनही गणेशमूर्तीकारांना अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे हे गणेशमूर्तीकार नाराज होते. अखेर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी – हमरापूर येथे या गणेशमूर्तीकारांची भेट घेवून केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सुनील तटकरे यांनी मूर्तिकरांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. या भेटीच्यावेळी पेण तालुक्यातील गणेश मूर्तीकार मोठया संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारकडून या मूर्तीकारांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन तटकरे यांनी यावेळी मूर्तिकारांना दिले. तसेच या शिवाय प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींवरील बंदीबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील सुनील तटकरे यांनी सांगितले.








Be First to Comment