कोरोना रूग्णांमध्ये आता दिसू लागली डेंग्यूसदृश लक्षणे : अचानक प्लेटलेट्सची संख्या होते कमी 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली : 🔷🔷🔶🔶
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. मात्र कोरोनाव्हायरसमध्ये होत असलेल्या बदलांमुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. प्लेटलेट्स सामान्यत: डेंग्यूच्या तापात कमी होतात, मात्र आता कोरोना रुग्णांमध्येही अशीच लक्षणं दिसू लागली आहेत . कोरोनाची लागण झालेल्या पेशंटची प्लेटलेटची संख्या 20 हजारांपेक्षा कमी होताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा रुग्णाची डेंग्यूची तपासणी केली जाते, तेव्हा एकाही रुग्णांत डेंग्यूची लक्षणे दिसली नाहीत.
पीजीआय लखनऊचे प्रोफेसर अनुपम वर्मा म्हणाले, की कोरोना रूग्णांमध्ये आता डेंग्यूसदृश लक्षणे दिसू लागली आहेत.ही लक्षणं चिंतेची बाब आहे. ते म्हणाले की, अचानक प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्यामुळे रुग्णांवर उपचार करणे खूप कठीण होत आहे.
तपासणीत असेही दिसून आले आहे की, कोरोना रुग्णाच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरही परिणाम करते, यात मोनोसाइड्स आणि मॅक्रोफेजेस पेशींवर हल्ला करतात. यामुळे प्लेटलेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया कमी होते. म्हणूनच रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होते.
अशा रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना प्लेटलेट्स देण्यात येत आहेत. अशा रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देखील दिली जाणे आवश्यक आहे. डॉ. अनुपम म्हणाले की कोरोनामध्ये असा बदल दिसून आला आहे. पूर्वी कोरोना रुग्णांना थ्रोम्बोसिस होता. यात, रुग्णाच्या रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात, ज्यासाठी त्याला टीपीए इंजेक्शन दिले गेले.
2021 पर्यंत अशी असणार परिस्थिती ?
अमेरिकेचे प्रसिद्ध कोरोना व्हायरस विशेषज्ज्ञ डॉ. एंथनी फाउची यांनी सांगितले की 2021 वर्षाच्या शेवटपर्यंत जीवन सर्वसामान्य होणार नसल्याची शक्यता आहे. फाउचीने सांगितले की, कोरोना व्हायरसची लस मदत करू शकेल, मात्र यातही काही अटी आहेत. त्यांचं असंही म्हणणं आहे की कोरोनाच्या ज्या लसीवर काम होत आहे, त्यापैकी एकाला 2020 च्या शेवटपर्यंत वा 2021 ला मंजुरी मिळेल.
फाउचीचं म्हणणं आहे की, जरी लशीला या वर्षी वा पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत मंजुरी मिळेल. मात्र तरीही ही लस नागरिकांना तातडीने उपलब्ध करता येणार नाही. MSNBC सोबत दिलेल्या मुलाखतीत फाउचींनी सांगितले की, मंजुरी मिळाल्यानंतर लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि सप्लाय करण्याची गरज आहे. 2021 च्या मध्याच्या शेवटपर्यंत लोकसंख्येच्या मोठ्या भागातील लोकांना लस देणं आणि त्यांना सुरक्षित करण्याचं काम पूर्ण होईल, असं दिसून येत नाही.
Be First to Comment