सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶
पेण तालुक्यातील राजीप कार्ली शाळेचे शिक्षक मोहन भोईर यांना सृजनशील शिक्षक ग्रुपतर्फे “राज्यस्तरीय सुपर 30 शिक्षक” पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. भोईर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व तंत्रस्नेही क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्काराबद्दल मोहन भोईर म्हणाले की, माझे मित्र व एक उपक्रमशील शिक्षक संदीप वारगे व त्यांच्या टीमने माझ्यातला सृजनशील शिक्षकाचा सुपर थर्टीमध्ये समावेश केला. सृजनशील शिक्षक ग्रुपला मी सत्कारा साठी योग्य वाटलो याचे श्रेय आतापर्यंतचे माझे सर्व विद्यार्थी व सर्व प्रकारच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात आलेले सर्व शिक्षक यांनाच आहे.
कोणत्याही क्षेत्रातील पुरस्काराने, गौरवाने प्रोत्साहन मिळतो आणि मित्रांचे पाठबळ आणखी वाढते. यातून पुरस्कारार्थीची चिकित्सा वा समीक्षा थांबू नये, हीच नम्र अपेक्षा असल्याचे मोहन भोईर यांनी सांगितले.







Be First to Comment