सिटी बेल लाइव्ह / नवी मुंबई (विठ्ठल ममताबादे) 🔷🔶🔷🔶
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामधे रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले रक्ताची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत, जनजागृती करत श्री. गणेश वैष्णवी सेवा भावी संस्थेतर्फे संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या मार्फत श्री. सिद्धिविनायक मंदिर, ईश्वर नगर, दिघा, नवी मुंबई येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .
या रक्तदान शिबिरात संस्थेच्या सभासदांनी तसेच नागरिकांनी कोरोना काळातही आपल्या घरातून बाहेर पडून सामाजिक बांधिलकी जपत वेळेत रक्तदान केले. यावेळी शासनाचे सोशल डिस्टन्स चे नियम पाळत हे शिबीर अत्यंत उत्साहात,उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले.रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाचे मृत्यू होऊ नये , गोरगरीब गरजू व्यक्तीला वेळेत रक्त पुरवठा व्हावा या उद्देशाने तसेच महाराष्ट्र शासनानेही रक्तदान बाबत पुढाकार घ्या असे सामाजिक संस्थांना आवाहन केले होते.त्या अनुषंगाने संस्थेतर्फ रक्तदान शिबीर ठेवण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणेश बासुतकर यांनी सांगितले.











Be First to Comment