Press "Enter" to skip to content

मराठा समाजाचा पुन्हा एल्गार : रायगड जिल्हास्तरीय बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🔶🔷🔶🔷

सकल मराठा समाज, रायगड ची जिल्हास्तरीय मिटींग आज व्ही के हायस्कूल पनवेल येथे संपन्न झाली. पेन, उरण, कर्जत, पनवेल, खालापुर येथील मराठा समन्वयक या मिटींगला मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिटींग मध्ये खालीलप्रमाणे ठराव संमत झाले :

  1. शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी शैक्षणिक प्रवेशावर बंदी बाबतचा निर्णय ज्या तत्परतेने घेतला त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला !
  2. राज्य सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण कायम ठेवण्याबाबत तात्काल पाऊले उचलावीत !
  3. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सर्व मराठा समाज तीव्र नाराज असुन ही नाराजी व्यक्त करण्यासाठी घटनात्मक मार्गाने शासकिय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याबाबत सर्वांचे एकमत झालं !
  4. संपुर्ण महाराष्ट्रातील समन्वयकांशी समन्वय साधुन आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल !
  5. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कोणत्याही विभागात नोकरभरती करू नये !

या बैठकीत विनोद साबळे , गणेश कडु , वृषाली शेडगे , राजश्री कदम , स्वप्निल काटकर , तुषार सावंत , दशरथ पाटील , प्रदीप देशमुख , सुहास येरुनकर , रुपेश कदम , राजू भगत , यतिन देशमुख , सचिन भगत , विकास वारदे , राजू नलवडे आदी समाजबांधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.