सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / रामचंद्र घोडमोडे 🔷🔶🔷🔶
बहुउद्देशीय संघर्ष समिती हरिहरेश्वर बागमांडले च्या वतीने वीज बिले माफ करण्यासाठी महावितरण श्रीवर्धन कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पश्वभूमीवर सहा ते सात महिने चालू असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वसाधारण नागरिकांची अवस्था अतिशय बिकट असताना त्यामध्ये आलेला ३ जून च्या महाचक्रीवादळाने आजून भर घातली. सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई देखील काही नागरिकांना मिळालेली नाही. आशा या परिस्थित अडकलेल्या नागरिकांच्या मानेवर सूरी ठेवण्याचा काम महावितरण कंपनी करत आहे. हे महावितरण कंपनीने थांबविले पाहिजे.
वर्षानुवर्षे विज बिलाचा तडाखा सर्वसाधारण नागरिक सहन करत आहेत. पण हा लॉकडाऊन संपेपर्यंत एकही नागरिक वीज बिल भरणा करणार नाहीत. शासनाने वीज बिल माफी करून जनतेला दिलासा द्यावा.
नागरिक हजारोनी आलेली बिले भरण्याच्या मानसिकतेत नाहीत
पर्यटन व्यवसाय बंद, नोकरी धंदे बंद, काहींना लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत .तिथे महावितरण नागरिकांना आकडेवारी दाखवून मानसिक त्रास देत आहे हे त्वरित थांबवावे कोणत्याही नागरिकाचे वीज बिल खंडित केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल अस निवेदन देण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील खळे, सचिव दीपक देवकर, सल्लागार रत्नाकर लांबाडे, महेंद्र टाकले, सचिन गुरव, नझीर शिरगावकर, मंगेश कोमनाक, शिवाजी खळे, जळगावकर व अन्य सभासद नागरिक उपस्थित होते.
वीजबिल भरला नाही तर आपलं वीजपुरवठा खंडित केला जाईल या भीतीने काही नागरिक पोटाला चिमटा काढत व्याजी पैसा घेत वीजबिल भरू लागली आहेत. जनतेला ह्या होणाऱ्या नाहक त्रासाची दखल घेत समितीने महावितरण श्रीवर्धन कार्यालय, तसेच पालकमंत्री अदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले असून श्रीवर्धन महावितरण कडून कोणत्याही नागरिकांचे वीजपुरवठा पुढील तीन महिने खंडित होणार नाही असे आश्वासन समितीला देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने भयभीत न होता. शासनाकडून जनतेला दिलासा मिळेल वीजबिल माफ होतील समितीने दिलेल्या निवेदनाला यश येईल जनतेनी वीजबिल भरू नये असं आवाहन बहुउद्देशीय संघर्ष समिती ने केला आहे.







Be First to Comment