Press "Enter" to skip to content

शौर्यचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🔷🔶🔶🔷


दरवर्षीप्रमाने शौर्य चा वाढदिवस पुनाडे आदिवासी वाडी वर जाऊन त्याचे मित्र यांच्या बरोबर केक कापून आणि खाऊ व जेवण वाटप करून साजरा करण्यात आला.

उरण येथील सामाजिक कार्यकर्ते व अनेक संघटनांमध्ये विविध पदावर कार्य करणारे राकेश केळकर यांचा मुलगा शौर्य राकेश केळकर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे आदिवासी वाडीवर खाऊ वाटप व जेवण वाटप करण्यात येते. ह्या वर्षी सुद्धा कुमार शौर्य याच्या वाढदिवसानिमित्त पुनाडे उरण येथील आदिवासी वस्ती वर खाऊ व जेवण वाटप करण्यात आले. त्यावेळी राकेश केळकर यांची पत्नी सौ नेहा केळकर,मुलगी वांशिका केळकर आदी सहकुटुंब उपस्थित होते.

सदरप्रसंगी उरण सामाजिक संस्था युवा मंच चे अध्यक्ष विलास गावंड हे सुद्धा उपस्थित होते, विलास गावंड यांचे सुपुत्र कुमार वरद याने लॉक डाऊन च्या काळात 50 च्या वर स्वातंत्र्य सैनिक,व महापुरुषांचे चित्र बनवले होते त्याची दखल घेत राकेश केळकर व कुटुंबीयांनि चि. वरद यांचे अभिनंदन करून चित्रकलेचे साहीत्य भेट दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.