Press "Enter" to skip to content

रायगड भूषण हभप.शेळके महाराज यांचा ७२ वा वाढदिवस साजरा


सिटी बेल लाइव्ह / खांब/रोहा (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔶🔷


रोहे शहरातील अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील गुरुवर्य वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक,सामाजिक व शैक्षणिक आदी क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहत सकारात्मक विचारसरणी अंगी बाळगणारे थोर विचारवंत समाज प्रबोधक रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप.बाळाराम पांडुरंग शेळके यां चा ७२ वा वाढदिवस कौटुंबिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

आज मितीस संपूर्ण देशावर,राज्यावर, जिल्ह्यावर तसेच रोहा तालुक्यामध्ये कोरोना या महामारीने अक्षरक्ष: थैमान घातल्याने सर्वत्र भययुक्त वातावरण पसरले असल्याने या अगोदरच प्रशासनाने सावर्जनिक कार्यक्रमावर तात्पुरती बंदी घालण्याने रोहे शहरातील अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील गुरुवर्य गाढे अभ्यासक सामाजिक,शैक्षणिक, आदी क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहत सकारात्मक विचारसरणी अंगी बाळगणारे थोर विचारवंत समाज प्रबोधक रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप.बाळाराम पांडुरंग शेळके यांना ७२ वा अभिष्टचिंतन सोहोळा मोजक्याच साथीदारांच्या सोबतीने एक कौटुंबिक सोहोळा म्हणून अगदी साध्या पद्धतीने साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी रोहा अष्टमी मराठा समाज विकास मंडळाचे खजिनदार किशोर तावडे,सुनिल शेळके,निखिल राठोड,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मढवी,अमोल बिरवाडकर, केशव म्हस्के आदी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थिती मध्ये घरगुती व कौटुंबिक वातावरणामध्ये हा सोहोळा निमित्ताने आदर्श शिक्षक नंदकुमार मरवडे सर लिखित स्वरूपातील रायगड भूषण हभप बाळाराम महाराज शेळके यांच्या थोडक्यांत जीवन चरित्र काव्य पंक्ती सन्मानपत्र,शाल,पुष्पगुच्छ,गणेश प्रतिमा देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मानपूर्वक गौरव सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.