सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷
महाराष्ट्र मंडळ गोरेगाव मुबंई यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील हाळ आदिवासी वाडी, बौद्ध वाडा येथील सुमारे 200 कुटूंबाना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
कोरोना संसर्गात कारखानदारी,छोटेमोठे उद्योगावर मंदिचे सावट आहे.हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवाचा रोजगार हिरावला गेला आहे.अशा परिस्थितीत मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र मंडळ गोरेगाव मुबंई पुढे सरसावले आहे. मंडळ 73 वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून रविवारी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष,रमाकांत थोरवे, कार्यवाह अजय सावंत, खजिनदार रविंद्र मातोंडकर, पंकज दळवी, समीर नाईक, नरेश सावंत ,संदीप सावंत शिवसेना चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख हुसेन खान ,हाळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अजीम मांडलेकर, ग्रामपंचायत सदस्य रवी वाघमारे,चंदर वाघमारे सचिन क्षीरसागर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते रामदास करकरे, मंगेश क्षीरसागर, प्रशांत जाधव यांच्या उपस्थित जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.







Be First to Comment