Press "Enter" to skip to content

जय श्रीराम पतसंस्थेतर्फे समुद्र किनारी वृक्षारोपण


100 सुरूची झाडे लावुन पर्यावरण संवर्धन 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / रायगड-अमूलकुमार जैन 🔶🔷🔷🔶


निसर्ग चक्रीवादळात 1980 मध्ये लागवड केलेले उंचच उंच सुरूची झाडे
उन्मळून पडली असुन या ओक्या बोक्या जागी स्वच्छता करून जयश्रीराम नागरी पतसंस्था, मुरुड या संस्थेतर्फे 100 सुरूच्या वृक्षांची लागवड नुकतीच करण्यात आली .

या वेळी पतसंस्थेचे चेअरमन अॅड . मोहन तांबडकर , व्हा . चेअरमन दिलीप जोशी, संचालक नंदकुमार जोशी , प्रकाश पंड्या , एम.एस. जाधव , व्यवस्थापक संजय ठाकूर व कर्मचारी वृंद उपस्थित होते .

सामाजिक बांधिलकीतुन श्रीराम पतसंस्था रक्तदान शिबीर , वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करीत असल्याचे व्हा चेअरमन दिलीप जोशी म्हणाले . तर समुद्र किनारी हिरवाई करण्याचा अल्पसा प्रयत्न पतसंस्थेचा असल्याचे चेअरमन अॅड . तांबड कर यांनी यावेळी सुचित केले .
व्यवस्थापक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्र किनारी
सार्वजनिक बांधकाम विश्रांती गृह ते ग्रामिण रुग्णालयाच्या मागच्या बाजुस स्वच्छता करून सकाळी 9 ते 12 या वेळात कर्मचारी वृंदाच्या सहकार्याने सुरुची 100 झाडांची लागवड करून श्रमसंस्काराचा परिचय दिला .

यामध्ये उमेश भायदे, मधुकर वाघरे, विनोद जोशी ,सिध्दी गद्रे, निकेतन मसाल, प्रियांका भगत ,बिपीन चोरघे ,स्वराली विरकुड, सिध्देश निरकर व रुपेश जामकर यांचा सहभाग होता .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.