Press "Enter" to skip to content

खालापूर तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत चालल्याने चिंतेत वाढ


सिटी बेल लाइव्ह / खोपोली (संतोषी म्हात्रे )🔷🔶🔷🔶


खालापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकड्याने आज दोन हजाराचा आकडा पार केला आहे. यातील 1700 रुग्णांनी या आजारावर मात करून आपल्या घरी परतण्यात यश मिळविले आहे तर 310 रूग्ण या आजारावर दवाखान्यात उपचार घेत आहेत. असे असतांना तालुक्यातील 87 रुग्णांनी मात्र आपला प्राण गमविला आहे.

आजच्या दिवसातील एकूण रुग्णांचा आकडा हा 42 असून आज एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.

खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांचा आजचा आकडा हा 23 असून खोपोली नगरपालिका क्षेत्रातील रुग्णांचा आकडा हा 17 आहे तर दोन रुग्ण हे खालापूर नगरपंचायत हद्दीतील आहेत.मागील काही दिवसापूर्वी हा आकडा सिंगल आकड्यावर आला होता.मात्र गेल्या काही दिवसात हा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढतांना दिसत आहे. त्यातच रुग्ण दगावण्याचाही आकडा वाढत असल्याने याचा धसका सर्वांनी घेतला आहे.

तालुक्यातील वैद्यकीय सेवा आजार रोखण्यासाठी किंवा रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी कुचकामी ठरत असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.