सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔷🔶🔷🔶
कर्जत तालुक्यातील वैजनाथ आणि कराळे वाडी या दोन विभागांना जोडणारा रस्ता आणि रस्त्यावरील मोरीचा भाग मोठ्या प्रमाणात खचल्यामूळे या मार्गावरून जाताना वाहन चालकांची कोणत्याहि क्षणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.पाऊसामुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली असून तक्रारी करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांची सुरक्षा धोक्यात असल्याचे बोलले जात आहे .
याबाबतीत आत्ता पोलीस मित्र संघटना संबंधित अधिकारी वर्गास जाब विचारणार असल्याचे समजते .
या परिसरातील हा रस्ता ५० मीटर अंतरावरून भिवपुरी टाटा पावरकडे जाणारा जुना मार्ग आहे.ह्या रस्त्यावरून परिसरातील अनेक गावांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.तसेच परिसरातील अनेक चाकरमानी कामावरून रात्री अपरात्री जात येत असतात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
अपघात होण्या अगोदरच वैजनाथ, कराळेवाडी,गौळवाडी येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून सूद्धा प्रशासनाचे रस्त्याच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे .
ही महत्वाची बाब लक्षात घेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे , अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि वकील संदीप साळवी गौळवाडी ते कराळेवाडी प्रवास करीत असताना नागरिकांनी त्यांच्याकडे सांगितली व त्यांनीही प्रत्यक्षात पाहणी केली .
नागरिकांचे वाहन अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असून पोलीस मित्र संघटना संबंधित अधिकारी वर्गास जाब विचारणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी नागरिकांना आश्वासन दिले . तरी संबंधित मोरी ताबडतोब दुरुस्त करावे , अशी मागणी पोलीस मित्र संघटनेने केली आहे .







Be First to Comment