Press "Enter" to skip to content

पेण मधील पत्रकारांची कोरोना चाचणी शिबिर संपन्न

सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार) 🔷🔶🔷🔶

माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याची घटना घडल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांच्या नेतृत्वाखाली येथील पत्रकारांंनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेऊन तालुक्यातील पत्रकारांन करिता कोरोना चाचणी शिबिर घेण्याची मागणी केली. 

सदर मागणीची दखल प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्वरित घेतली व पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना पत्रकारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. तसेच जे पत्रकार पॉझिटिव्ह येतील यांच्या कुटुंबीयांची अँटीजन टेस्ट करण्याचे व पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी देवा पेरवी, राजेश प्रधान, पत्रकार तथा नगरसेवक संतोष पाटील, कमलेश ठाकूर, राजेश कांबळे, विजय मोकल,सुनिल पाटील, स्वप्नील पाटील, नरेश पवार, संतोष पाटील (हमरापुर), प्रशांत पोतदार, अनिस मणियार,दीपक लोके, प्रकाश माळी, धनाजी घरत, प्रदीप मोकल, एजाज मणियार, गणेश पाटील, दिपक लोके,विनायक पाटील, सुभाष टेम्बे, किरण बांधनकर, मितेश जाधव या पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली.

यावेळी तिस हुन अधिक पत्रकारांची करोना चाचणी करण्यात आली.सदर शिबिराकरिता डॉ.अभिजित पाटील, डॉ.प्रभाकर सोनावणे, डॉ.विशाल महाजन, डॉ.तेजस्विनी म्हात्रे व दिशा लॅबचे डॉ.गोसावी यांनी विशेष मेहनत घेतली. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.