सिटी बेल लाइव्ह / धाटाव(शशिकांत मोरे) 🔶🔷🔶🔷
भारतीय कामगार सेनेचे चिटणीस कामगार नेते शंकर मोरे यांना यूनिकेम कामगाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भारतीय कामगार सेनेचे चिटणीस, कामगार नेते शंकर मोरे यांचे नुकतेच कोरोना आजाराने निधन झाले. सामाजिक कार्याच्या आवडिसह कामगाराच्या समस्या जाणून त्या सामोपचाराने सोडविण्यात त्यांचा हातखंडा होता.शंकर मोरे यांच्या निधनामुळे कामगार वर्गावर शोककळा पसरली.युनिकेम कामगारांच्या वतीने नुकतीच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी युनिकेम युनिट अध्यक्ष सचिन भगत यांच्या समवेत सर्व पदाधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.त्याच्या सोबत अनुभवलेल्या काही प्रसंगाची अनेकांनी यासमयी आठवण करून शोक व्यक्त केला.







Be First to Comment