सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) 🔶🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील बापूजी देव मित्रमंडळ बारसोली आणि जनकल्याण रक्तपेढी महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दरम्यान झालेल्या शिबिरात रक्त दात्याना प्रमाणपत्र देण्यात आले.
सामाजिक कार्यात नावाजलेल्या बापूजी देव मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.यावर्षीही या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत अनेक दात्यानी रक्तदान केले.या शिबिराला विजय मोरे,विनोद पाशिलकर,यशवंत रटाटे,अशोक मोरे,रोहिदास पाशीलकर यांसह अनेक मान्यवरांनी सदिच्छा पर भेट देऊन मंडळाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी महाड येथील डॉक्टर सह सहकारी वर्ग व मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाशिलकर,उपाध्यक्ष विलास जाधव,सचिव उत्तम म्हसकर,खजिनदार अजय ठाकूर यांसह आशिष पेटकर, मयूर ठाकूर,अशोक जाधव,ज्ञानेश्वर जाधव यांसह सहकारी मित्रांनी विशेष मेहनत घेतली.







Be First to Comment