व्हेंडर मिळत नसल्याने उरण मधिल ग्रामपंचायतींसाठी सॅनीटरी नॅपकीन डिस्ट्राॅयर मशीन खरेदी निधी परत 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण ( सुभाष कडू) 🔷🔶🔶🔷
उरण मधील ग्रामपंचायतींसाठी सॅनीटरी नॅपकीन डिस्ट्राॅयर मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेला निधी खर्च न झाल्याने परत गेला. तो परत मिळविण्यासाठी पंचायत समिती उरण प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे.परंतू संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या योजनेपासून उरण तालुका मात्र वंचीतच राहीला.
उरण पंचायत समिती चा 2961475रु निधी दि.31 मार्च 2020 पर्यंत खर्च न झाल्याने जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग राजीप ने आपल्या खात्यावर वर्ग केले. या निधीमध्ये 2,38,000 रुपये हे भारत सरकारने उरण मधील 34 ग्रामपंचायतींना प्रती ग्रामपंचायत एक सॅनीटरी नॅपकीन डिस्ट्राॅयर मशीन खरेदी करण्यासाठी दिली होती. परंतू प्रती ग्रामपंचायत 7000 प्रमाणे सदर मशिन देण्यास उरण पंचायत समिती प्रशासनास कोणीही व्हेंडर मिळाला नाही.परंतू त्याचवेळी जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील ग्रामपंचायंती मध्ये मात्र या मशिन्स बसवील्या जात होत्या.
रायगड जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांतील ग्रामपंचायतींना या मशीन्स बसविल्या गेल्या.पण उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीना मात्र आर्थीक वर्ष संपला तरी या मशिन्स बसविल्या गेल्या नाहीत. शेवटी या मशिस्न साठी आलेला निधी जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग राजीप च्या खात्यावर परत गेला.
सदर निधी परत मिळावा म्हणून गटविकास अधिकारी उरण निलिमा गाडे यांनी उप मुख्य कार्यकारी अधीकारी पाणी व स्वच्छता विभाग राजीप आलिबाग यांना दि.6-07-20 रोजी पत्रव्यवहार केला आहे.परंतू आजूनही सदर निधी मात्र उरण पंचायत समीतीला परत मिळाला नाही.त्यामूळे महिलांसाठी केंद्रसरकार राबवत आसलेली योजना संपूर्ण रायगड जिल्ह्यात फक्त उरण तालुक्यातच राबविली गेली नाही.
आर्थीक वर्षाच्या शेवटी सदर निधी जमा झाली होती.परंतू त्या रकमेत सॅनीटरी नॅपकीन डिस्ट्राॅयर मशीन द्यायला कोणीही व्हेंडर तयार नव्हता.त्यामूळे मशिन्स खरेदी करता आल्या नाहीत.परंतू आर्थीक वर्ष संपताच ति रक्कम परत गेली.आत्ता मशीन देणारे व्हेंडर मिळाल्यामूळे निधी परत मागविली आहे.
निलीमा गाडे -- गटविकास अधीकारी उरण







Be First to Comment