शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत यांची मागणी 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / मुरूड : अमूलकुमार जैन 🔶🔷🔷🔶
मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाडा या परिसरात ७ कोटी ८२ लाख रुपये किमतीची जेट्टी उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले होते.यासाठी आयुक्त मत्सालय यांनी दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी इ- निविदा सुद्धा काढण्यात आली होती.परंतु निधी नसल्यामुळे सदरचे काम रखडले होते.रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी नुकताच या भागाचा दौरा करून टोकेखार येथे जेट्टी मंजूर केली आहे.या जेट्टीस आमचा विरोध नाही.परंतु राजपुरी जेट्टीसाठी आमदार जयंत पाटील व माजी आमदार पंडितशेठ पाटील व माजी आमदार मीनाक्षीताई पाटील यांनी प्रयत्न करून हि जेट्टी मंजूर केली होती सदरची जेट्टी ला खासदार साहेबानी सदरचे काम लवकरात लवकर कार्यान्वित करून द्यावे द्यावा अशी मागणी मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस व नगरसेवक मनोज भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
साई गौरी लॉजिंग येथे पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांच्या समवेत राजपुरी येथील श्री महालक्ष्मी सोसायटीचे चेरमन विजय गीदि, एकदरा येथील हनुमान मच्छिमार सोसायटीचे चेरमन पांडुरंग आगरकर ,सागर कन्या मच्छिमार सोसायटीचे चेरमन मनोहर बैले ,मोतीराम पाटील, माया वाघरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी मनोज भगत यांनी सांगितले कि, कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर खासदार आमदार त्याच प्रमाणे विकास कामांसाठी निधी गोठवण्यात आला आहे. त्यामुळे टोकेखार येथील नवीन जेट्टी होण्यास खूप वर्षाचा अवधी लागणार आहे.परंतु राजपुरी जेट्टी साठी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असून फक्त निधीची आवश्यकता आहे.रायगडच्या खासदारांनी राजपुरी जेट्टी चे काम सुद्धा जलद गतीने मार्गी लावून कोळी समाजाला व मच्छिमारांना दिलासा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत त्यांनी केली आहे.
राजपुरी येथील श्री महालक्ष्मी सोसायटीचे चेरमन विजय गीदि यांनी सांगितले कि, राजपुरी जेट्टी हि मध्यवर्ती ठिकाणी असून या जेट्टीवर लिलाव शेड,शीतगृह,फ्लोटिंग जेट्टी,रॅम, शौचालय आदी स्वरूपाच्या सोइ सुविधा देण्यात येणार आहेत.राजपुरी येथील मासळी सुकवण्याच्या ओट्याला धरून नवीन जेट्टी विकसित करण्यात येणार होती.सुमारे दोनशे होड्या या ठिकाणी साकारण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे.
रायगडचे खासदार तटकरे यांनी सदर जेट्टीसाठी केंद्र शासनाकडून मत्स्य उद्योग महामंडळास निधी प्राप्त करून दिल्यास या कामाला गती प्राप्त होणार आहे..
यावेळी मनोज भगत यांनी सांगीतले कि,राजपुरी जेट्टीसाठी चे स्वप्न शेकापचे जेष्ठ नेते कृष्णा गीदि यांचे होते.त्यांच्या पाठपुराव्यामुळे सदरच्या कामाला गती मिळाली होती.
राजपुरी जेट्टीसाठी केंद्राकडून खासदार तटकरे यांनी मदत दिली तर हे काम निश्चितच मार्गी लागणार आहे.राजपुरी जेट्टीला लागणाऱ्या विविध ना-हरकत दाखले सुद्धा देण्यात आले आहेत. राजपुरी येथे जेट्टी झाल्यास दिघी, आगरदांडा,राजपुरी,कुडगाव,आदी परिसरातील बोटी साकारण्यात मदत होणार आहे.
यावेळी विजय गीदि व मनोहर बैले यांनी खासदार सुनील तटकरे यांचे विशेष आभार व्यक्त केले कि, मच्छिमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तटकरे हे आम्हाला नेहमीच सहकार्य करीत असतात.यावेळी उपस्थितांनी टोकेखार येथील जेट्टीस विरोध नसून राजपुरी जेट्टीचे काम सुद्धा जलद गतीने व्हावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.







Be First to Comment