Press "Enter" to skip to content

माथेरान नगरपरिषदेचे जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔶🔷🔶

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी ठोस पाऊल उचलले असून नागरिकांच्या सेवेसाठी नगरपरिषदेच्या मार्फत मुख्य रस्त्यावर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली नगरपरिषद आपल्याला सर्वोतोपरी काळजी घेण्यास तत्पर आहे. त्याहीपेक्षा जास्त आपण स्वसुरक्षासाठी आपल्या स्वतः बरोबर आपल्या परिवार,समाज,आपलं माथेरान ची सुरक्षा जपणं अत्यावश्यक आहे. शासनाचे नियम पाळा आपण सर्वांनी एकत्रितपणे एकमेकांना सुरक्षित ठेवायची जबाबदारी आपली सर्वांची आहे.असेही आवर्जून नगराध्यक्षा
प्रेरणा प्रसाद सावंत यांनी सांगितले आहे.


माथेरान हे छोटेसे पर्यटनस्थळ असल्याने सर्वजण एकमेकांच्या नेहमीच सान्निध्यात येत असतात. त्यामुळे नकळत स्पर्शाने अथवा चुकून एखादया घोळक्यात संभाषण करताना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.माथेरान अन लॉक केल्यापासून थोड्या प्रमाणात का होईना पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस सुरू आहे.

पुढील काळात पर्यटन हंगाम सुरू होणार असल्याने प्रत्येकाने सेनेटायझर आणि मास्क लावून आपापले व्यवसाय करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
नगरपरिषदेच्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी वर्ग रुग्णांची उत्तम प्रकारे तपासणी करून घेत आहेत. दरदिवशी कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी स्वतंत्र खोल्यांमध्ये रुग्णांची सोय नगरपरिषदेने केलेली असून रुग्ण लवकरच बरे सुध्दा होत आहेत.

कोरोना या आजाराला कंटाळून चालणार नाही तर त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण प्रशासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. आपले व्यवसाय करतांना स्वतः योग्य ती काळजी घेऊन ग्राहकांना सुध्दा त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिक यांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. कुणा पर्यटकांनी मास्क लावला नसेल तर त्यांना काही वस्तू विकत देऊ नयेत.मास्क न लावणाऱ्या व्यक्तीवर पर्यटकांवर सुध्दा नगरपरिषदे मार्फत दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. कोरोना वर मात करण्यासाठी सर्वांनी स्वतासह इतरांची सुध्दा काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.
प्रसाद सावंत --

गटनेते माथेरान नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.