Press "Enter" to skip to content

लोकराज्य चा ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण विशेषांक प्रकाशित


सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे अलिबाग : 🔶🔷🔷🔶


महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’  मासिकाचा  सप्टेंबर 2020 चा  ‘ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण ‘ विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे.
            

सप्टेंबरच्या अंकात ऑनलाईन शिक्षण व प्रशिक्षणासंदर्भातील शासनाचे धोरण, त्याची अंमलबजावणी तसेच कौशल्य शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण,  वैद्यकीय शिक्षण आदि क्षेत्रातील कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरील शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी   विकास, इतर मागास बहुजन कल्याण आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांची माहिती, वन,  गृहनिर्माण,  आरोग्य आदि विषयीची माहिती,  महत्वाच्या घडामोडी व मंत्रिमंडळाचे निर्णय इत्यादी माहितीचा या अंकात समावेश करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.