सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶
मुख्यमंञ्याच्या खालापूरातील भिलवले फार्महाऊसची सुरक्षा वाढविण्यात आली असून दोन दिवसापूर्वी फार्महाऊस दादागिरी करणारे दोन पञकार आणि चालक यांची कसून चौकशी सुरू असल्याने प्रकरणाचे गूढ कायम आहे..
मंगळवारी संध्याकाळी साङेसात वाजणेचे सुमारास निळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तीन इसमानी ठाकरे फार्महाऊस कूठे आहे याची चौकशी केली होती. सुरक्षा रक्षकाला तिघांचा संशय आला होता. त्याने माहित नाहि असे उत्तर दिले होते.त्यानंतर तिघानी जबरदस्तीने आत प्रवेश करित अश्लील शिवीगाळी व धक्काबुक्की करून तेथून पलायन केले होते.घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस विश्वजीत काईंगङे यांनी तपास चक्रे वेगात फिरवत सर्वञ नाकाबंदिचे आदेश दिले होते.
दाऊदकङून मातोश्री उङविण्याची आलेली धमकी मुळे दहशतवाद विरोधी पथक देखील सक्रिय होवून त्याच राञी नवी मुंबुईत संशयित कारसह तिघाना ताब्यात घेण्यात आले होते.तिघांवर गुन्हा दाखल करून 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठङीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत.
रायगङ जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यानी बुधवार व गुरूवार दोन्ही दिवस खालापूर पोलीस ठाण्यात भेट दिल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.स्टिंग ऑपरेशन कि अन्य काहि हेतूने तिघे आले होते याबाबत स्पष्ट झालेले नाही. पोलीसांनी तिघांजवळून जप्त केलेल्या कार मध्ये काहि संशयास्पद सापङले का ? याबाबत तपासाचा भाग असल्याने निश्चित,माहिती मिळालेली नाही.








Be First to Comment