मोकळ्या जागा भाडे तत्वावर व व्यवसाईक गाळेधारकांनी ठेवलेल्या पोटभाडेकरु सदंर्भात कारवाई करण्याचा नगरपालीकेला केल्या सुचना…🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / खोपोली ( संतोषी म्हात्रे ) 🔶🔷🔷🔶
शहरावर कोरोनाचे सावट असल्याने दि.९ सप्टेंबर रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी , नगराध्यक्षा , उपनगराध्यक्षा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व नगरसेवकांची मीटिंग आयोजित केली.. या मीटिंग मध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.. परंतु या मीटिंग मध्ये झालेले विषय पत्रकारांना कळविण्याकरीता आज दि. ११ सप्टेंबर रोजी नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी पत्रकार परिषदचे आयोजन केले.
काही दिवांपूर्वीच ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार संतोष पवार यांचे निधन झाले असल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पत्रकार परिषद सुरू करण्यात आली. नगरसेवकांच्या मीटिंग मध्ये घडलेले विषय नगराध्यक्षा यांनी पत्रकारांना सांगितल्या नंतर एक एक विषयांवर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.
सर्वप्रथम शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी पावसाचे प्रमाण कमी झाल्यास लवकरच रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असून काही रस्त्यांच्या कामाचे टेंडर काढले आहेत. तर काही काढायचे आहे असे उत्तर दिले आहे..
नगरपालिकेच्या जागा भाडे तत्वावर देणार यावर काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता या बाबत प्रश्न विचारला असता.. नगराध्यक्षा यांचे म्हणणे आहे की, विरोध दर्शविला तरी काही होणार नसून बाकी सर्व नगरसेवक , नगरसेविका यांनी सहमती दिली आहे. त्यामुळे पालिकेची जागा ज्यांना गरज आहे त्यांना ९ वर्षाच्या भाडे तत्वावर देणार असून पालिका फक्त जागा देणार व जागेवर कच्या स्वरूपाचे बांधकाम जागा घेणारा करणार व ९ वर्षानंतर पालिका सदरील जागा खाली करणार असल्याचे सांगितले..
शहरात पालिकेने अनेक गाळे बांधून भाडे तत्वावर दिले आहेत. परंतु त्या ठिकाणी ज्याच्या नावावर गाळे आहेत ते व्यवसाय करत नसून त्यांनी (पोट भाडेकरू ठेऊन) दुसऱ्यांना पालिकेचे गाळे भाड्याने देऊन जास्तीचे भाडे घेत आहेत व हा नफा पालिकेला कमी व भाडेकरूला जास्त होत आहे या याबाबत लवकरच सर्वे करून पोट भाडेकरू यांना काढून योग्य ती कारवाई करू असे सांगण्यात आहे आहे.. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जुना पुतळा काढला आहे… त्या जागी नवीन पुतळा कधी बसविणार या बाबत.. अचानक देशावर कोरोनाचे सावट आले असल्याने पुतळा बसविण्यास विलंब लागला परंतु आता लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात सुट मिळाली असल्याने लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पुतळा बसविणार असल्याचे सांगितले आहे..
सर्व चर्चा चालू असतानाच मासिक सर्व साधारण सभेमध्ये पत्रकारांना आमंत्रित केले जात नाहीत व नागरिकांना ही काही कळविले जात नाहीत.. ही पालिकेची हुकुमशाही आहे का ? असा सवाल पत्रकारांनी सवाल केला व इतरही अनेक प्रश्न पत्रकारांनी मांडले असता.. सर्व प्रश्नांची उत्तरे ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यांनी समाधान कारक देत.. या पुढे पत्रकारांना सभेत बोलावले जाईल याबाबत उत्तर दिले..
घेण्यात आलेले पत्रकार परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाल्या नंतर उपनगराध्यक्षा विनिती कांबळे यांनी पत्रकारांचे आभार व्यक्त करताना , शहरासाठी खूप काही करायची जिद्द होती परंतु देशावर कोरोनाचे सावट आल्याने अनेक कामे करायची राहून गेली.. तरीही कोरोणाचे सावट कमी झाल्यास एक एक कामे पूर्ण करू.. सध्या शहरातही कोरोनाचे प्रमाण वाढत आहे तरी सर्व नागरिकांनी आपली काळजी घेत जबाबदारी पार पाडावी व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेला मदत करावी या भावना व्यक्त करत पत्रकार परिषद संपन्न करण्यात आली.







Be First to Comment