वाढीव वीज बिल बिलांसंदर्भातील तक्रारी वरिष्ठांना कळविल्याचे मनसेला पत्र
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶
कोरोना महामारीच्या काळात विजबिलांचा प्रश्न अतिशय गंभीर झाला. सुधागड तालुक्यातील गोरगरीब, सर्वसामान्य जनता अवाजवी, वाढीव विजबिलाने त्रस्त झाली आहे. या संदर्भात सुधागड तालुका मनसेच्यावतीने सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात पाली महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावर बुधवारी (दि.9) पाली विजवीतरण कार्यालयातून वाढीव वीज बिलांसंदर्भातील तक्रारी वरिष्ठांना कळवण्यात आल्या आहेत. अशा आशयाचे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
वाढीव विजबिलांचा प्रश्न आता मुख्य अभियंत्यांच्या दालनात गेला आहे, त्यामुळे येथून काय निर्णय होणार याकडे सुधागडवासीय जनतेचे लक्ष लागले आहे. मनसेने हाती घेतलेल्या वीज बिल आंदोलनाला जनतेने देखील पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान या प्रश्नावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करत जर यावर लवकर तोडगा निघाला नाही तर मनसे तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करेल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी यावेळी दिला.







Be First to Comment